Manish Jadhav
गरोदरपणात महिलांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण या दिवसात अन्नाबाबत थोडासाही निष्काळजीपणा गरोदर स्त्रीचे आरोग्य बिघडवू शकतो.
गर्भधारणे दरम्यान डॉक्टर महिलांना अनेक गोष्टी खाऊ किंवा पिऊ नयेत याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे आरोग्य बिघडण्याचा धोका असतो.
पण गरोदरपणात अनेक महिलांना प्रश्न पडतो की त्या कोल्ड्रिंक्स पिऊ शकतात का? यामुळे शरीराला कोणते नुकसान होते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज (27 मार्च) आपण वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
गर्भवती महिलांनी कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे. याचे कारण म्हणजे कोल्ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
काही कोल्ड्रिंक्समध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे महिलेला झोपेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
जर साखरेची पातळी जास्त असेल तर कोल्ड्रिंक्स प्यायल्याने शरीराला नुकसानदायक ठरु शकते.
कोल्ड्रिंक्सशिवाय गरोदरपणात महिलांनी दारु, सिगारेट आणि मद्यपान करु नये.