Manish Jadhav
आयपीएल 2025 मधील गुजरात टायटन्सविरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामना चांगलाच रंगला. कर्णधार श्रेयस अय्यरच्या शानदार खेळीच्या जोरावर पंजाबने हा सामना जिंकला.
पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 18 व्या मोसमात तडाखेदार सुरुवात केली. पंजाबने गुजरातचा 11 धावांनी पराभूत केले.
श्रेयसने पंजाबच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. श्रेयसने सामन्यातील पहिल्या डावात नाबाद 97 धावांची खेळी खेळली.
अय्यरने आपल्या शानदार खेळीच्या जोरावर ख्रिस गेल आणि रोहित शर्मा या दोघांचा षटकारांचा विक्रम मोडीत काढला.
अय्यरच्या नावावर कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम कायम आहे.
अय्यरने यंदाही अशीच धाकड कामगिरी केली. गुजरात टायटन्सविरुद्ध 9 षटकार लगावले. याबाबतीत त्याने रोहित शर्मा आणि ख्रिस गेलला मागे सोडले.