Akshata Chhatre
माझ्या प्रेग्नेंसीमध्ये सध्या काही कॉम्प्लिकेशन (गुंतागुंत) तर नाही ना? हे डॉक्टरांकडून स्पष्टपणे जाणून घ्या.
मला कोणती औषधे घ्यायची आहेत आणि त्यांची नक्की वेळ काय असावी? हे लिहून घेणे गरजेचे आहे.
घरातील कामे करताना किंवा चालताना मला कोणती सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे? हे तज्ज्ञांना नक्की विचारा.
माझ्या आहारात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत? डाएटबद्दल सविस्तर चर्चा करा.
मला पुढच्या तपासणीसाठी नक्की कधी यायचे आहे? तारखांची नोंद आधीच करून ठेवा.
जर तुम्हाला खूप थकवा, चक्कर किंवा अंगावरून रक्त जात असेल, तर त्याबद्दल डॉक्टरांना सांगायला अजिबात संकोच करू नका.
योग्य संवाद आणि डॉक्टरांचा सल्ला तुमचे गरोदरपण सुखकर आणि सुरक्षित बनवू शकतो. जागरूक राहा, सुरक्षित राहा!