गोमन्तक डिजिटल टीम
नियोजन महत्त्वाचे!
विद्यार्थ्यांनी अभ्यासाची योग्य वेळापत्रक तयार करून त्यानुसार अभ्यास करावा. नियोजन केल्यास तणाव कमी होतो.
रोज थोडा-थोडा अभ्यास
शेवटच्या क्षणी घाईगडबडीने अभ्यास करण्यापेक्षा दररोज ठरावीक वेळ अभ्यास करणे फायदेशीर ठरते.
पुरेशी झोप घ्या!
रात्रभर अभ्यास करण्याऐवजी ६-८ तासांची शांत झोप घ्या. त्यामुळे मेंदूला विश्रांती मिळते आणि लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.
आरोग्याची काळजी घ्या!
संतुलित आहार घ्या, पाणी पुरेसे प्या आणि जंक फूड टाळा. चांगले आरोग्य असेल तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येते.
सोशल मीडियापासून अंतर ठेवा!
परीक्षेच्या काळात मोबाइल, सोशल मीडिया किंवा टीव्हीवर जास्त वेळ घालवणे टाळा. त्याऐवजी लक्ष अभ्यासावर केंद्रित ठेवा.
तणावमुक्त राहा!
मेडिटेशन, हलके व्यायाम किंवा आवडती गाणी ऐकल्याने मन शांत राहते आणि तणाव कमी होतो.
परीक्षेआधी प्रश्नपत्रिका नीट वाचा!
घाई न करता प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या. उत्तरं नीट आणि स्पष्ट लिहा.