Pratapgad Fort: "जिथे रक्ताचे सडे सांडले!" प्रतापगडाच्या 'रक्तपेढी'चा थरारक अन् रंजक इतिहास; आदिलशाही सैन्याची उडवली दाणादाण

Manish Jadhav

प्रतापगड किल्ला

15व्या शतकात जावळीचे खोरे जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी नीरा आणि कोयना नदीच्या खोऱ्यावर प्रशासकीय व लष्करी नियंत्रण ठेवण्यासाठी 1556 मध्ये भोरप्या डोंगरावर प्रतापगड किल्ल्याची बांधणी केली. मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली या अभेद्य किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले.

Pratapgad Fort | Dainik Gomantak

प्रतापगडची लढाई

10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडच्या पायथ्याशी मराठा साम्राज्य आणि विजापूरच्या आदिलशाही सैन्यामध्ये घनघोर युद्ध झाले. या लढाईने मराठा साम्राज्याचा पाया मजबूत केला आणि शिवरायांच्या गनिमी काव्याची ताकद जगासमोर सिद्ध केली.

Pratapgad Fort | Dainik Gomantak

अफझलखानाचा वध

विजापूरचा क्रूर सरदार अफझलखान मोठ्या सैन्यासह स्वराज्यावर चालून आला होता. महाराजांनी त्याला आपल्या मुत्सद्देगिरीने प्रतापगडाच्या पायथ्याशी आणले. भेटीदरम्यान खानाने दगाफटका करताच शिवरायांनी वाघनखे आणि बिचव्याच्या साहाय्याने त्याचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला.

Pratapgad | Dainik Gomantak

जिवा महाला अन् संभाजी कावजींचा पराक्रम

अफझलखानाच्या वधाच्या वेळी त्याच्या अंगावर धावून आलेल्या सय्यद बंडाचा वार जिवा महालाने मोडून काढला, ज्यावरुन 'होता जिवा म्हणून वाचला शिव' ही म्हण प्रसिद्ध झाली. तसेच संभाजी कावजी कोंढाळकर यांनीही या लढाईत अतुलनीय शौर्य दाखवले.

Pratapgad | Dainik Gomantak

शिवछत्रपतींचा अश्वारुढ पुतळा

किल्ल्याच्या वरच्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले प्रसिद्ध भवानी माता मंदिर आहे. याच मंदिरात महाराजांना तुळजापूरच्या भवानी मातेची प्रसन्नता लाभली असे मानले जाते. तसेच किल्ल्यावर महाराजांचा भव्य अश्वारुढ कांस्यपुतळा उभारण्यात आला आहे, ज्याचे उद्घाटन 1957 मध्ये झाले होते.

Pratapgad | Dainik Gomantak

आदिलशाही सैन्याचा पराभव

प्रतापगडाची रचना बालेकिल्ला आणि खालचा किल्ला अशा दोन भागांत आहे. किल्ल्याला चारी बाजूंनी नैसर्गिक कड्यांचे आणि भक्कम बुरुजांचे संरक्षण लाभले आहे. युद्धाच्या वेळी जिथे आदिलशाही सैन्याचा पराभव झाला, त्या भागाला आजही 'रक्तपेढी' म्हणून ओळखले जाते.

Pratapgad | Dainik Gomantak

मराठा अस्मितेचे प्रतीक

प्रतापगडच्या विजयामुळे मराठ्यांच्या सैन्याला अफाट खजिना, तोफा आणि हत्ती-घोडे मिळाले. या एकाच विजयाने आदिलशाही सत्तेला मोठा धक्का दिला आणि संपूर्ण भारतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि युद्धाच्या रणनीतीचा धाक निर्माण झाला.

Pratapgad | Dainik Gomantak

Taragad Fort: "जिथं रक्तानं न्हाऊन निघाली बिटली टेकडी!", मुघलांचं साम्राज्य हादरलं; तारागड किल्ल्याचा थरकाप उडवणारा संघर्ष

आणखी बघा