Taragad Fort: "जिथं रक्तानं न्हाऊन निघाली बिटली टेकडी!", मुघलांचं साम्राज्य हादरलं; तारागड किल्ल्याचा थरकाप उडवणारा संघर्ष

Manish Jadhav

तारागड किल्ला

राजस्थानातील अजमेर येथील बिटली टेकडीवर वसलेला तारागड किल्ला भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. संपूर्ण राजपुताना प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जयपूर, जोधपूर, मेवाडच्या वाटांवर वर्चस्व गाजवण्यासाठी या किल्ल्यावर कब्जा असणे गरजेचे होते.

Taragarh Fort | Dainik Gomantak

चौहाण घराण्याचा ऐतिहासिक वारसा

11व्या शतकात राजा अजयपाल चौहाण यांनी या किल्ल्याची उभारणी केली होती. सम्राट पृथ्वीराज चौहाण यांच्या काळात हा किल्ला अजमेरच्या बलाढ्य सत्तेचे आणि राजपूत अस्मितेचे मुख्य केंद्र बनला.

Taragarh Fort | Dainik Gomantak

सुलतान आणि अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण

दिल्लीच्या सुलतानांनी राजपुतान्यावर ताबा मिळवण्यासाठी तारागड किल्ल्यावर अनेकदा भीषण हल्ले केले. अल्लाउद्दीन खिलजीने राजपुताना मोहिमेदरम्यान तारागड जिंकण्यासाठी सैन्याची मोठी फळी तैनात केली होती, जिथे राजपुतांनी प्राणांची बाजी लावून कडवा प्रतिकार केला.

Taragarh Fort | Dainik Gomantak

मेवाडचे राजकुमार 'पृथ्वीराज सिसोदिया'

15व्या शतकात मेवाडचे पराक्रमी राजकुमार पृथ्वीराज सिसोदिया यांनी या किल्ल्यावर विजय मिळवला. त्यांनी आपल्या पत्नी 'ताराबाई' यांच्या नावावरुन या किल्ल्याचे नाव 'तारागड' ठेवले.

Taragarh Fort | Dainik Gomantak

अजमेरवर वर्चस्वासाठी घनघोर युद्ध

मुघल सम्राट अकबर आणि जहांगीर यांच्या काळात तारागड हा मुघलांच्या राजपुताना मोहिमांचा मुख्य लष्करी तळ बनला. मुघल सत्ता कमकुवत झाल्यानंतर मराठ्यांनी आणि स्थानिक राजपूत राजांमध्ये या किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी अनेक रक्तरंजित लढाया झाल्या.

Taragarh Fort | Dainik Gomantak

मराठ्यांचे वर्चस्व

18व्या शतकात मराठा साम्राज्याचे बलाढ्य सरदार महादजी शिंदे यांनी तारागड किल्ल्यावर ताबा मिळवला आणि अजमेरमध्ये मराठ्यांची सत्ता स्थापन केली. मराठ्यांच्या काळात या किल्ल्याची तटबंदी अधिक मजबूत करण्यात आली.

Taragarh Fort | Dainik Gomantak

किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व

14भव्य बुरुज, उंच कडे आणि नैसर्गिक चढणीमुळे तारागड किल्ला जिंकणे अत्यंत कठीण मानले जाई. या किल्ल्यावरील लढायांनी वाळवंटातील सत्तेची गणिते अनेकदा बदलली, ज्यामुळे याला 'राजस्थानचा जिब्राल्टर' म्हणूनही ओळखले जाते.

Taragarh Fort | Dainik Gomantak

Stop Eating Onions: घरचे म्हणतील, "हा चमत्कार झाला कसा?" 1 महिना कांदा सोडून तर पाहा!

आणखी बघा