Manish Jadhav
प्रतापगड (Pratapgad) हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला असून तो सातारा जिल्ह्यात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावर स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रूला नामोहरम केले होते. मराठा साम्राज्यात प्रतापगडाचे एक महत्वाचे स्थान राहिले आहे.
प्रतापगड हा किल्ला 1656 मध्ये बांधला गेला. हा किल्ला महाबळेश्वरच्या जवळ आहे.
प्रतापगडाला मराठा साम्राज्याच्या इतिहासात खूप महत्त्व होते. हा किल्ला आता एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनला आहे.
प्रतापगड हा तोच किल्ला आहे, जिथे 1659 मध्ये महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला होता.
भवानी मंदिर
प्रतापगडावर प्रसिद्ध भवानी मातेचे मंदिर आहे.
समुद्रसपाटीपासून सुमारे 3543 फूट उंचीवर हा किल्ला आहे.