Akshata Chhatre
प्रेमानंद महाराज यांनी सध्याच्या तरुणाईतील रिलेशनशिप ट्रेंड्स आणि त्याचे घटस्फोटाच्या प्रकरणांवर होणारे परिणाम यावर त्यांचे मत व्यक्त केले आहे.
जोपर्यंत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आणि लिव्ह-इन रिलेशनशिपचे कल्चर समाजात राहील, तोपर्यंत घटस्फोट होत राहतील आणि त्यांची संख्या वाढतच राहील.
वारंवार ब्रेकअप करणाऱ्या लोकांना महाराजांनी 'भ्रष्ट' ठरवले आहे. असे लोक नात्याचे महत्त्व समजू शकत नाहीत. त्यामुळे ना तर मुलगी अशा मुलासोबत राहू शकते, ना मुलगा अशा मुलीसोबत.
महाराजांनी संबंध पवित्र ठेवण्याचे आवाहन केले आहे. दोन लोक जेव्हा भेटतील, तेव्हा त्यांनी एकमेकांसाठी पवित्र असले पाहिजे.
पूर्वीच्या आयुष्यातील गोष्टी खणून काढू नयेत. नवीन नात्याची सुरुवात करताना हेच विचारले पाहिजे की 'आजपासून आम्ही तुमचे आणि तुम्ही आमचे'.
जीवनातील 'चुकीच्या गोष्टी' थांबल्याशिवाय घटस्फोट थांबणार नाहीत, त्यामुळे जीवन पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा.
महाराजांचा हा सल्ला आजकालच्या तरुणांना समजणे कठीण आहे, कारण ते सध्याचे रिलेशनशिप ट्रेंड्स फॉलो करतात.