Akshata Chhatre
पावसाळा सुरू झाला की डासांचा त्रास प्रचंड वाढतो. हे डास केवळ चावून त्रास देत नाहीत, तर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे जीवघेणे रोगही पसरवतात.
डासांना दूर ठेवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या रासायनिक फवार्यांचा वापर केला जातो. पण हे फवारे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी.
यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सोपा आणि सुरक्षित घरगुती उपाय होममेड मॉस्किटो रिपेलेंट स्प्रे
१० मिली कडुलिंब तेल, ३० मिली खोबरेल तेल आणि एक रिकामी स्प्रे बाटली.
स्प्रे बाटलीमध्ये कडुलिंब आणि खोबरेल तेल मिसळा. झाकण लावून ती बाटली हलवा, चांगले मिसळा.तयार झालेले मिश्रण घराच्या कोपऱ्यांमध्ये, खिडक्यांजवळ आणि बाल्कनीत फवारा.
घराभोवती पाणी साचू देऊ नका हे डासांचे अंडी घालण्याचे मुख्य ठिकाण आहे. खिडक्या व दारांवर मच्छरदाणी लावा, बाल्कनीत तुळशीचं रोप ठेवा.