Akshay Nirmale
मिझोराममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता निकाल समोर आले आहेत. त्यानंतर येथे मुख्यमंत्रीपदासाठी लालदुहोमा यांचे नाव घेतले जात आहे.
सध्या मिझोराममधील सहा राजकीय पक्षांना एकत्र आणून त्यांनी द झोरम पीपल्स मुव्हमेंट पक्ष आकाराला आणला. त्यांनी निवडणूक जिंकली आहे.
लालदुहोमा हे 1977 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेतून ते गोव्यात कार्यरत झाले होते.
लालदुहोमा यांचे गोव्याशी खास नाते राहिले आहे. गोव्यातील किनारी भागातील हिप्पी आणि अमली पदार्थांच्या तस्करीच्या कारवाईचे नेतृत्व त्यांनी केले होते.
त्यांच्या या कामगिरीची दखल स्थानिक गोवेकरांनी तर घेतलीच पण राष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. तस्करीविरोधी कारवायांमुळे ते चर्चेत असत.
पंतप्रधान इंदिरा गांधी चोगम परिषदेनिमित्त गोव्यात आल्या असताना त्यांनी लालदुहोमा यांच्या कामाची माहिती घेतली आणि त्यांना दिल्लीत पोलिस उपायुक्त केले.
1984 मध्ये ते खासदार बनले. पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र ठरलेले ते देशातील पहिले खासदार ठरले होते. याच कारणामुळे त्यांनी एकदा आमदारकीही गमावली होती.