Akshay Nirmale
अभिनेत्री सारा अली खान ही गोवा व्हेकेशनवर आली होती. त्याचे फोटोज तिने सोशल मीडियात शेअर केले आहेत.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तथा इफ्फीनिमित्त सारा गोव्यात आली होती. यावेळी ती वागातोर येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास होती.
या हॉटेलमधील काही फोटोज साराने सोशल मीडियात शेअर केले आहेत.
यातील काही फोटोजमध्ये सारा या हॉटेलच्या स्विमिंग पुलजवळ बिकिनीमध्ये दिसून येते.
साराचे वास्तव्य ज्या हॉटेलमध्ये होते त्या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे सुमारे 43 हजार रूपये इतके आहे.
दरम्यान, साराने इफ्फीच्या कार्यक्रमासाठी परिधान केलेल्या पिवळ्या साडीतील काही फोटोजही शेअर केले आहेत.
सारा आगामी काळात ए वतन मेरे वतन या चित्रपटात दिसणार आहे. भूमिगत रेडिओ केंद्र चालवणाऱ्या उषा मेहतांचा हा बायोपिक आहे.