Sameer Amunekar
सर्वप्रथम चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवरील धूळ आणि अतिरिक्त तेल निघून जाईल.
एक छोटा बटाटा किसून त्याचा रस काढा. हा रस त्वचेवर वापरण्यासाठी ताजा असावा.
कॉटनच्या मदतीने बटाट्याचा रस संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. डोळ्यांच्या आसपासचा भाग टाळा.
बोटांच्या टोकांनी गोलाकार हालचाली करत 2-3 मिनिटे हलका मसाज करा. त्वचेवर जोरात घासू नका.
बटाट्याच्या रसात थोडे बेसन किंवा ओट्स पावडर मिसळून हलका फेसपॅक तयार करू शकता. चेहऱ्यावर लावून काही मिनिटे ठेवा.
फेसपॅक पूर्णपणे धुवून चेहरा स्वच्छ करा आणि मऊ टॉवेलने हलक्या हाताने पुसा.
त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवण्यासाठी शेवटी मॉइश्चरायझर लावा. बटाट्यामुळे कायमचा गोरेपणा मिळतो किंवा त्वचेच्या समस्या बऱ्या होतात, असा दावा करता येत नाही. संवेदनशील त्वचा असल्यास आधी छोट्या भागावर पॅच टेस्ट करा.