Manish Jadhav
रात्री 10 ते 2 या वेळेत शरीरात मेलाटोनिन आणि 'ग्रोथ हार्मोन्स'चे प्रमाण सर्वाधिक असते, ज्यामुळे त्वचेची पेशी पातळीवर पुनर्निर्मिती (Cell Regeneration) होते.
गाढ झोपेदरम्यान शरीरात कोलाजन (Collagen) तयार होते, ज्यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहते आणि सुरकुत्या वेळेआधी येत नाहीत.
7 ते 8 तासांची पुरेशी झोप घेतल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे (Dark Circles) कमी होतात आणि चेहऱ्याची सूज ओसरते.
झोपेच्या वेळी रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेतील विषारी घटक बाहेर पडतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज (Natural Glow) येते.
कोरियन महिला झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर किंवा स्लीपिंग मास्क लावतात; गाढ झोपेत त्वचा हे घटक अधिक प्रभावीपणे शोषून घेते.
पुरेशा झोपेमुळे 'कोर्टिसोल' (Stress Hormone) कमी होते, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, ॲक्ने आणि त्वचेचा जळजळपणा रोखण्यास मदत होते.
कोरियन महिला झोपताना कॉटनऐवजी सिल्क (Silk) पिलोकेस वापरतात, ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा घासली जात नाही आणि मॉइश्चर टिकून राहते.