Akshata Chhatre
केळी खाल्ल्यानंतर आपण ती साल फेकून देतो, पण तुम्हाला माहीत आहे का की ही सालही केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते?
केळीच्या सालीमध्ये असे अनेक पोषकतत्त्व असतात जे केस मजबूत, मऊ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
केळीच्या सालीमध्ये असलेले पोटॅशियम टाळूतील ओलावा टिकवून ठेवते आणि केसांची मुळे मजबूत करते.
एक पिकलेले केळीचे साल, एक टेबलस्पून नारळ तेल आणि एक टेबलस्पून मध घेऊन एकत्र मिक्स करा. हे मिश्रण केसांना आणि टाळूवर लावून साधारण ३० मिनिटे ठेवा.
एक केळीची साल आणि दोन कप पाणी घ्या. हे पाणी १० ते १५ मिनिटे उकळा आणि थंड झाल्यावर गाळा.
शॅम्पूनंतर शेवटच्या पाण्यासारखे हे मिश्रण केसांवर ओता. यामुळे केस अधिक चमकदार आणि स्वच्छ राहतात.