Akshata Chhatre
मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करताना काय योग्य आहे, याचा विचार करा. डिजिटल फूटप्रिंट भविष्यात त्यांच्या गोपनीयतेवर परिणाम करू शकतो.
इंटरनेटवर मागे राहणारे आपले पाऊलखुणांचे संकेत म्हणजे डिजिटल फूटप्रिंट. हे सार्वजनिक असतात आणि कायमस्वरूपी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करतात.
मुले आगीशी, काचेशी खेळत असताना फोटो टाकू नका. त्याऐवजी त्यांना समज देऊन सुरक्षिततेचे भान द्या.
आंघोळ करतानाचे फोटो चुकीचे फोटो चुकीच्या लोकांच्या हाती लागू शकतात. भविष्यात मुलांना याचा लाज आणि चेष्टेचा सामना करावा लागू शकतो.
पॉटी ट्रेनिंगसारखे खासगी क्षण सोशल मीडियावर शेअर करू नका. या गोष्टी आईवडिलांसाठी खास असल्या तरी मुलांसाठी लाजिरवाण्या ठरू शकतात.