Manish Jadhav
सध्या हिवाळ्याला सुरुवात झाली असून, गारठा कमालीचा वाढला आहे.
हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आणि हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या उद्धभतात.
आज (3 डिसेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे याविषयी जाणून घेणार आहोत...
तूप कॅलरीज वाढवते, असे आपल्याला वाटते पण तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील खराब चरबी कमी होते.
हिवाळ्यात सुका मेवा हा एक उत्तम पर्याय असतो. अॅप्रिकोट, अंजीर व खजूर हे नैसर्गिक उबदारपणा देतात.
पचनक्रिया सुधारण्यासाठी गूळ हा अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे, जो आपल्याला हिवाळ्यात उबदार ठेवतो.
हिवाळ्यात दालचिनीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. शरीराच्या चयापचय क्रिया सुधारण्यासाठी दालचिनी अत्यंत फायदेशीर आहे.
हिवाळ्यात सर्दी आणि फ्ल्यूचा सामना करण्यासाठी मध हा अत्यंत उपयुक्त आहे.