Manish Jadhav
पोस्टाच्या माध्यामातून ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. त्यात अनेक लहान बचत योजना आहेत. तर काही कठीण प्रसंगी कुटुंबाला सुरक्षा देणाऱ्या योजनाही आहेत.
पोस्टाची सार्वजनिक सुरक्षा योजनाही अशीच एक योजना आहे, ज्यामध्ये 3 योजनांचा समावेश होतो.
पोस्ट ऑफिस जन सुरक्षा योजनेअंतर्गत, तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करु शकता.
तुमच्या कमाईतून छोटीशी गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी भविष्य सुरक्षित करु शकतात. चला तर मग या 3 योजनांबद्दल जाणून घेऊया...
ही एक मुदत विमा योजना आहे, जी तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनेअंतर्गत, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा विशेषत: अशा लोकांना फायदा होऊ शकतो जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि खाजगी विमा कंपन्यांचे प्रीमियम भरु शकत नाहीत. 2015 मध्ये सुरु झालेली सुरक्षा विमा योजना अपघात झाल्यास 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण प्रदान करते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये भरावा लागेल. जर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर विम्याची रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाते. या योजनेचा लाभ 18 वर्षे ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्तींना मिळू शकतो.
जर तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करायची असेल, तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) गुंतवणूक करु शकता. भारत सरकारच्या या योजनेद्वारे मासिक 5,000 रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते.
तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. कोणताही भारतीय नागरिक जो करदाता नाही आणि ज्यांचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान आहे, ते सरकारच्या या योजनेत योगदान देऊ शकतात.