Kavya Powar
वागातोर येथे 28 ते 30 डिसेंबरदरम्यान ‘सनबर्न’ ईडीएम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
याकाळात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मध्यवर्ती देखरेख नियंत्रण समिती तसेच अन्य तीन उपसमित्या स्थापन केल्या आहेत.
यावेळी मोठ्या संख्येने लोक एकत्र जमत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे
भाजपच्या आरोग्य विभागाचे निमंत्रक डॉ. शेखर साळकर यांनी ‘सनबर्न’मुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या मेजवान्या दोन-तीन तासांच्या असतात. त्यामुळे कोविड फैलावाची शक्यता तशी कमी असते.
‘सनबर्न’मध्ये सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोक राहात असल्याने तेथे कोविडचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पार्टीत गर्दी नसते, तर ‘सनबर्न’मध्ये गर्दी असते. तेथे लोकांची संख्या जास्त असते.
त्यामुळे जर तुम्ही या काळात गोव्यात येत असाल तर स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या