Rohan Khaunte: गोवा पर्यटन खुलवण्यात 'मंत्री खवंटेंचा' वाटा मोलाचा

Akshata Chhatre

पर्यटनमंत्री

गोव्याचे पर्यटन मंत्री, रोहन खवंटे, यांचा आज जन्मदिवस. त्यांनी पर्यटनमंत्री म्हणून गोवा पर्यटन क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत. विशेषतः कोविडनंतर गोव्याच्या पर्यटनाला त्यांनी पुन्हा चालना दिली.

Goa Tourism | Dainik Gomantak

संकटाचा सामना

कोविड-19 नंतर गोव्यातील पर्यटन उद्योग मोठ्या संकटात होता. पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असून देखील पर्यटनात मंदी आली होती.

Goa Tourism | Dainik Gomantak

स्थानिक व्यवसायांना चालना

पर्यटनमंत्र्यांनी पर्यटनावर आधारित स्थानिक व्यवसायांना चालना दिली. स्थानिक खाद्य, आणि सांस्कृतिक पर्यटनाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. गोव्यातील पर्यटनाला वेगवेगळ्या स्थरांवर प्रोत्साहन देण्यासाठी देशांर्गत होणाऱ्या वेगेवेगळ्या सामिट्समध्ये पर्यटनमंत्री नेहमीच आघाडीवर असतात.

Goa Tourism | Dainik Gomantak

न्यू-यॉर्क स्क्वेअर

पर्यावरणीय संरक्षण आणि सुरक्षितता यावर लक्ष केंद्रित करून, त्यांनी इको-फ्रेंडली पर्यटन धोरणांची अंमलबजावणी केली. गोव्याचे नाव आंतराष्ट्रीय स्थरावर देखील पसरावे आणि विदेशी पर्यटकांना गोव्याबद्दल माहिती मिळावी म्हणून पर्यटन विभागाकडून न्यू-यॉर्क स्क्वेअरमध्ये देखील जाहिरात दिली होती.

Goa Tourism | Dainik Gomantak

नवीन दिशा

अलीकडच्या काळात गोवा पर्यटनावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. गोव्यातील पर्यटन संपल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र अशा परिस्थितीत वेळोवेळी समोर येत पर्यटनमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती पोहोचवण्याचे काम केले आहे.

Goa Tourism | Dainik Gomantak

स्मार्ट पर्यटन

त्यांनी गोव्यात स्मार्ट पर्यटन धोरण लागू केले. ऑनलाइन बुकिंग, डिजिटल टुर गाइड्स, आणि तंत्रज्ञानाच्या वापराने पर्यटन अनुभव सुधारला.

Goa Tourism | Dainik Gomantak

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

गोव्यातील सांस्कृतिक स्थळे आणि ऐतिहासिक वारसा जतन करून पर्यटकांसाठी आकर्षक बनवलेच, पण त्याच बरोबर गोव्याच्या पर्यटनाला फक्त देशातच नाही तर परदेशात देखील चालना देण्याचे काम रोहन खवंटे यांनी केले आणि परिणामी गोव्याच्या पर्यटनात लक्षणीय बदल पाहायला मिळतायत. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Goa Tourism | Dainik Gomantak
घरच्या घरी चीजकेक कसा बनवाल?