Sameer Panditrao
कोकणचा राजा हापूस चे बारसे कसे झाले हे आपण जाणून घेऊया.
आंब्याची लागवड चार हजार वर्षापूर्वी झाली. बौध्द भिक्षू ह्युएन सॅंगमुळे भारताला आंबा या पिकाची ओळख झाली.
हापूसला अल्फान्सो असं म्हणतात आणि याचं नाव ठेवण्यामध्ये पोर्तुगीजांचा मोठा वाटा आहे.
जिऑग्राफिकल इंडिकेशन जर्नल्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील पोर्तुगीज लष्करात अल्फान्सो डे अल्बकर्की नावाचे एक अधिकारी होते त्यांनी ही नवी जात विकसित केली.
स्थानिक लोक किंवा ग्रामीण भागात अपूस असे लोक म्हणायचे. महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचेपर्यंत याचा तोंडी उच्चार हापूस असा झाला.
आंब्याचे झाड चार पाच वर्षाचे झाले की फळ द्यायला सुरुवात होते.
सर्वसाधारणपणे आंब्याचे झाड 50 वर्षापर्यंत फळे देते. आंब्याच्या झाडाची निगा योग्य राखली तर हे झाड शंभर वर्षापर्यंत देखील फळ देते.