Akshata Chhatre
सध्या सगळीकडेच घिबली फोटोजची चर्चा सुरु आहे. या काळात एआय एवढ्या वेगाने पुढं चाललंय की त्याला टक्कर देणं कठीण झालंय.
तुम्ही घीबीली इमेजेसमधून गोवा कसा दिसतो पाहायला इच्छुक आहात का?
गोव्याचा समुद्र किनारा, गोव्यातील मंदिरं, चर्चेस कसे दिसत असतील? चला बघूया.
आम्ही गोव्यातील काही महत्वाच्या जागांचा यात समावेश केला आहे. यात सेंट झेवियर चर्च, समुद्र किनारा, फोंड्यातील मंदिर यांचा समावेश आहे.
Chatgptच्या माध्यमातून या नवीन टूलच्या मदतीने काही कार्टून इमेजीस बनवता येतात.
आपण स्वतः किंवा आपलं गाव कसं दिसतं हे पाहणं अनेकांसाठी आकर्षण ठरतंय.
हायाओ मियाझाकी यांनी या चित्रांची सुरुवात १९८५ मध्ये एका जपनीस स्टुडिओमध्ये केली होती.
असे फोटोज बनवण्यासाठी तुम्हाला chatgptला प्रोम्पट द्यावा लागतो आणि त्यानंतर फोटो बनून तयार होतो.
खरंतर Chatgpt कडून हे प्लस युझर्ससाठी तयार केलेलं तंत्र आहे मात्र तुम्ही मोफत टूल्स वापरून फोटोज बनवू शकता.