Pramod Yadav
पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाच्या मृत्यूला 500 वर्षे पूर्ण झाली आहेत.
24 डिसेंबर 1524 रोजी वास्कोचे कोचिन शहरात निधन झाले होते.
वास्को द गामाने 20 मे 1498 रोजी केरळमधील कालिकत बंदरावर पहिलं पाऊल ठेवलं.
युरोपमधून भारतात येणाऱ्या समुद्री मार्गाचा शोध लावण्याचे महत्वपूर्ण काम वास्कोने केले होते.
वास्कोला केनियातील मालिंदी शहरात गुजराती मुसलमान व्यापाऱ्याशी भेट झाली, त्यानेच हिंदी महासागराची माहिती दिली असे सांगितले जाते.
पार्तुगालमध्ये 22 नोव्हेंबर 1469 साली वास्को द गामाचा जन्म झाला होता.
वास्कोची इतिहास एक उत्तम खलाशी म्हणून नोंद आहेच शिवाय युरोप आणि आशियाला जोडणाऱ्या समुद्रमार्गाचा शोध लावण्यात त्याचे मोठे योगदान आहे.