Manish Jadhav
कोल्हापूर आणि कोकणाला जोडणारा 'फोंडा घाट' निसर्गप्रेमींसाठी नंदनवन ठरतो.
हा घाट केवळ निसर्गासाठीच नाही, तर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. कोल्हापूर संस्थानाच्या काळात हा मार्ग व्यापारासाठी मुख्य दुवा होता.
फोंडा घाटातील नागमोडी वळणे वाहन चालकांसाठी जशी आव्हानात्मक आहेत, तशीच प्रवाशांसाठी थरारक आणि आनंददायी आहेत.
पावसाळ्यात घाटाच्या कडेला अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाशांचे स्वागत करतात. येथील पांढरेशुभ्र कोसळणारे पाणी मनाला शांती देते.
या घाटाचा काही भाग राधानगरी अभयारण्याला लागून असल्याने नशिबात असेल तर तुम्हाला रानगवा किंवा विविध पक्ष्यांचे दर्शन घडू शकते.
घाटातील व्ह्यू पॉईंटवरुन दिसणारी कोकणची हिरवीगार दरी आणि दाट धुके फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
कोल्हापूरपासून साधारण 75-80 किमी अंतरावर हा घाट आहे. कोल्हापूर-राधानगरी-फोंडा-कणकवली असा हा प्रवास अविस्मरणीय ठरतो.