Manish Jadhav
डाळिंब हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर फळ मानले जाते, परंतु काही विशिष्ट आरोग्य समस्या असल्यास त्याचे सेवन करणे हानिकारक ठरु शकते.
डाळिंबामध्ये रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म असतात. जर तुम्हाला आधीच लो ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तर डाळिंब खाल्ल्याने रक्तदाब अधिक कमी होऊन चक्कर येण्यासारखे त्रास होऊ शकतात.
डाळिंबाची चव आंबट-गोड असते. ज्या लोकांना तीव्र ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी डाळिंब खाल्ल्याने पोटातील जळजळ वाढण्याची शक्यता असते.
डाळिंबाचा स्वभाव थंड असतो आणि त्यात फायबर भरपूर असते. जर तुम्हाला जुलाब किंवा अतिसाराचा त्रास होत असेल, तर डाळिंब खाणे टाळावे, कारण यामुळे समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
डाळिंबाचा प्रभाव थंड असल्याने, ज्यांना जुनाट खोकला, दमा किंवा कफाचा त्रास आहे, त्यांनी याचे सेवन टाळावे. विशेषतः रात्रीच्या वेळी डाळिंब खाल्ल्याने कफ वाढू शकतो.
काही लोकांना डाळिंब खाल्ल्याने त्वचेवर खाज येणे, रॅशेस उठणे किंवा सूज येणे अशा प्रकारच्या ॲलर्जीचा सामना करावा लागतो. अशा संवेदनशील लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डाळिंब खाऊ नये.
जर तुम्ही बीपी किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित औषधे घेत असाल, तर डाळिंब खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. डाळिंबाचा रस काही औषधांच्या परिणामात अडथळा आणू शकतो.
डाळिंबाच्या बिया पचायला जड असतात. जर तुम्हाला पचनाच्या तक्रारी किंवा बद्धकोष्ठतेचा तीव्र त्रास असेल, तर जास्त प्रमाणात डाळिंब खाल्ल्याने पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठता वाढू शकते.
डाळिंबात नैसर्गिक साखर असते. जरी हे फळ पौष्टिक असले, तरी मधुमेही रुग्णांनी याचे अतिसेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.