Pramod Yadav
३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला.
शिवरायांचा मृत्यू विषप्रयोग केल्याने, गंभीर ज्वर आल्यामुळे किंवा गुडघेदुखीने झाल्याचे सांगितले जाते.
शिवदिग्विजय बखरीतील उल्लेखानुसार सोयराबाईंनी महाराजांवर विषप्रयोग केल्याचे बखरीत म्हटलंय.
१९व्या शतकातील या बखरीचा लेखक अज्ञात असल्याने त्याच्या विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित केले जातात.
मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरीत देखील विषप्रयोगाचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, या बखरीतही ठोस पुरावे सादर न केल्याने याबाबत देखील साशंकता निर्माण होते.
सभासद बखरीत शिवरायांचा ज्वर अधिक वाढल्याचा उल्लेख करण्यात आला असून, यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटलंय.
कृष्णाजी अनंत सभासद या महाराजांच्या सल्लागाराने ही बखर राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून लिहिली होती.
राजांचे अंत्यसंस्कार राजाराम महाराजांनी केले असा उल्लेख देखील सभासद बखरीत करण्यात आला आहे.
याशिवाय इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल माहिती मिळते.
इंग्रजांच्या पत्रात शिवरायांना ब्लडी फ्लक्स झाल्याचे म्हटलं असून, ते १२ दिवसांपासून आजारी होते असा उल्लेख आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांवर विषप्रयोग झाल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.