Manish Jadhav
नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोन नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहेत.
Poco X7 आणि OPPO Reno 13 या दोन्ही सीरीज जानेवारी महिन्यात लॉन्च होणार आहेत. तर भारतात या दोन्ही सीरीजची लॉन्चिंग 9 जानेवारी रोजी आहे. चला तर मग या दोन स्मार्टफोनपैकी कोणता चांगला आहे ते जाणून घेऊया...
Poco आपला मिड रेंजचा स्मार्टफोन Poco X7 सीरीज लॉन्च करण्यासाठी तयार आहे. या क्लासिक स्मार्टफोनमध्ये अनेक खास फिचर्स तुम्हाला पाहायला मिळतील. कॅमेरा पूर्वीपेक्षा अधिक अॅडव्हान्स असू शकतो.
मात्र, त्याच्या किमतीत फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. त्याची किंमत 30 हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये असू शकते. अशा परिस्थितीत हा स्मार्टफोन या रेंजच्या फोनला टक्कर देऊ शकतो.
X7 Pro मध्ये 6.67-इंचाची OLED स्क्रीन आणि पॉवरफुल कॅमेरा सारखे शानदार फिचर्स आहेत. तर बॅटरी 6,000mAh एवढी आहे.
ओप्पो 9 जानेवारी रोजी आपली फ्लॅगशिप रेनो 13 सीरीज लॉन्च करण्यास तयार आहे. या स्मार्टफोनचे डिटेल्स अद्याप पूर्णपणे समोर आलेले नाहीत.
याचा कॅमेरा सेटअप खूप मजबूत असेल असे मानले जात आहे. Reno 12 32,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. अशा परिस्थितीत रेनो 13 ची किंमतही तशीच राहण्याची शक्यता आहे.