Akshata Chhatre
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज कुंभमेळ्याला भेट दिली. खुद्द पंतप्रधानांच्या भेटीने संपूर्ण कुंभ नगरीत एक नवा उत्साह निर्माण झाला आहे.
प्रयागराज येथील कुंभमेळा हा हिंदू धर्माचा सर्वात महत्त्वाचा आणि धार्मिक कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. लाखो भक्त या मेळ्यात भाग घेतात. यंदाच्या वर्षी १४४ वर्षांनी येणारा महाकुंभमेळा असल्याने उत्साह अधिक आहे.
पंतप्रधान मोदी यांनी भगवी वस्त्र परिधान केली होती, तसेच त्यांच्या गळ्यात देखील रुद्राक्षांची माळ होती.
प्रयागराजमध्ये शाही स्नान केल्यानंतर मोदींनी सूर्याला अर्घ्य दिले आणि सूर्यमंत्राचा जप केला.
यानंतर मोदींनी गंगा मातेची पूजा केली, तिला साडी आणि दूध अर्पण केले.
या भेटीनंतर मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना प्रयागराजच्या भेटीची माहिती दिली आणि या शाहीस्नानामुळे अत्यंत आनंद झाल्याचे नमूद केले.
गंगा स्नानानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा दिल्लीत रवाना झाले आहेत, या गंगा स्नानावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील होते.