Pramod Yadav
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू येथे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजसमधून उड्डाण घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बेंगळुरूस्थित संरक्षण PSU हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला भेट दिली.
यावेळी मोदींनी उत्पादनाच्या चालू कामाचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उड्डाण पूर्ण केल्यानंतर त्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
तेजस एक-सीटर लढाऊ विमान आहे परंतु पंतप्रधानांनी हवाई दल आणि नौदलाद्वारे चालवल्या जाणार्या ट्विन-सीट ट्रेनरमधून उड्डाण केले.
लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस हे 4.5-जनरेशनचे मल्टी-रोल लढाऊ विमान आहे.
भारतीय हवाई दलात सध्या 40 तेजस MK-1 विमाने कार्यरत आहेत तसेच, 83 तेजस MK-1A लढाऊ विमाने आहेत.