Pramod Yadav
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने राजधानी पणजीत कलरफूल सजावट करण्यात आली आहे.
कला अकादमी ते मार्केट परिसरात रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई पाहायला मिळत आहे.
दरवर्षी अशा प्रकारची रोषणाई अनेकांचे लक्ष वेधून घेत असते.
कला अकादमी, मनोरंजन सोसायटी परिसरात विविध शो आयोजित केले जातात.
नव्याने उद्घान झालेल्या योग सेतूवर देखील आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
विविध ठिकाणी ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त प्रवेश कमानी उभारण्यात आलीय.
यासह अनेक ठिकाणी चित्रपटसंबधिक प्रतिकृती पाहायला मिळत आहेत.