Ganeshprasad Gogate
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंगळवारी गोव्यात आगमन झाल्यावर त्यांनी बेतूल येथे भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे उद्घाटन केले.
यावेळी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपपुरी, राज्यपाल श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी KTC बस स्टँड, मडगाव येथे 'विकसित भारत, विकसित गोवा' या सार्वजनिक कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली
याप्रसंगी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक राज्यपाल श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद तानवडे तसेच इतर मंत्री,आमदार उपस्थित होते.
पंतप्रधानांनी रोजगार मेळ्याअंतर्गत विविध विभागांमधील 1930 नवीन सरकारी नियुक्त्यांना नियुक्तीचे आदेश वितरित केले आणि विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रेही दिली.
आजच्या सभेला राज्यभरातून मंत्री, आमदार, खासदार तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.