Pranali Kodre
ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेट संघाने 11 फेब्रुवारी रोजी भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभूत करत 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
या सामन्यानंतर सामन्यानंतर संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज क्वेना मफाकाला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
15 पर्व खेळवण्यात आलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत मालिकावीर पुरस्कार जिंकणारा मफाका 13 वा खेळाडू ठरला.
1988 आणि 1998 साली झालेल्या या स्पर्धेत मालिकावीर पुरस्कार देण्यात आलेला नाही. मात्र 2000 साला पासून प्रत्येक स्पर्धेत मालिकावीर पुरस्कार देण्यात आले आहेत. 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत मालिकावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंवर एक नजर टाकू
मालिकावीर - युवराज सिंग
मालिकावीर - तातेंदा तायबू
मालिकावीर - शिखर धवन
मालिकावीर - चेतेश्वर पुजारा
मालिकावीर - टीम साऊदी
मालिकावीर - डॉमनिक हेंड्रिक्स
मालिकावीर - विल बसिस्तो
मालिकावीर - एडेन मार्करम
मालिकावीर - मेहदी हसन
मालिकावीर - शुभमन गिल
मालिकावीर - यशस्वी जयस्वाल
मालिकावीर - डेवाल्ड ब्रेविस
मालिकावीर - क्वेना मफाका