Pranali Kodre
ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेट संघाने 11 फेब्रुवारी 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.
ऑस्ट्रेलियाने रविवारी बेनोनीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाला 79 धावांनी पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.
ऑस्ट्रेलियाने तब्बल 14 वर्षांनी 19 वर्षांखालील वर्ल्डकपवर नाव कोरले. तसेच एकूण चौथ्यांदा ऑस्ट्रेलियाने 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला.
ऑस्ट्रेलियाने 2024 पूर्वी 1988, 2002 आणि 2010 साली 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला आहे.
1988 साली गॉफ पार्कर यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पहिला 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला होता.
त्यानंतर 2002 साली कॅमेरॉन व्हाईटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला होता.
यानंतर 2010 साली मिचेल मार्शच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला होता.
त्यानंतर आता ह्यु वेबगेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकपवर नाव कोरले.