Sameer Amunekar
सुकलेल्या रोपांना एकदम भरपूर पाणी देऊ नका. थोड्या-थोड्या प्रमाणात नियमित पाणी दिल्यास मुळे पुन्हा सक्रिय होतात.
पूर्णपणे सुकलेली पाने, फुले आणि फांद्या कापून टाका. त्यामुळे रोपाची ऊर्जा नवीन पालवी वाढवण्यासाठी वापरली जाते.
प्रत्येक रोपाला वेगवेगळ्या प्रमाणात सूर्यप्रकाशाची गरज असते. जास्त उन्हामुळे सुकलेल्या रोपांना काही दिवस अर्धसावलीत ठेवा.
कुंडीतील माती हलक्या हाताने सैल करा आणि सेंद्रिय खत, कंपोस्ट किंवा गांडूळखत वापरा. यामुळे मुळांना पोषण मिळते.
कुंडीच्या तळाशी पाणी साचत असल्यास मुळे कुजतात. ड्रेनेज होल मोकळे आहेत का, हे नक्की तपासा.
पानांवर डाग, बुरशी किंवा किडी दिसल्यास त्वरित उपाय करा. कडुनिंब तेलाचा फवारा किंवा सेंद्रिय कीटकनाशक प्रभावी ठरते
रोप एका दिवसात हिरवेगार होत नाही. योग्य पाणी, खत आणि काळजी घेतल्यास काही आठवड्यांत नवीन पालवी आणि फुले दिसू लागतील.