Sameer Amunekar
दिवसाची सुरुवात एका सौम्य फेस वॉशने करा. चेहरा स्वच्छ असल्यास मेकअप नैसर्गिक वाटतो आणि त्वचेवर ताजेपणा येतो.
कॉलेजला जाताना उन्हापासून संरक्षण महत्त्वाचे आहे. जेल-बेस्ड सनस्क्रीन वापरा, जे त्वचेला चिपचिपीत न करता संरक्षण देते.
त्वचा कोरडी पडू नये म्हणून हलके मॉइश्चरायझर वापरा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक (Natural Glow) येते.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा डाग लपवण्यासाठी कन्सीलरचा वापर करा. पूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन न लावता फक्त आवश्यक ठिकाणी कन्सीलर लावल्याने लूक नॅचरल राहतो.
डोळ्यांना फ्रेश लूक देण्यासाठी थोडे काजळ आणि एक कोट मस्करा पुरेसा आहे. यामुळे डोळे टवटवीत दिसतात.
कॉलेजसाठी डार्क लिपस्टिकपेक्षा 'टिनटेड लिप बाम' उत्तम. हे ओठांना मॉइश्चराईज ठेवते आणि चेहऱ्यावर एक हलका गुलाबी रंग (Flush of color) देते.
वेळ कमी असल्यास केस मोकळे ठेवा किंवा एक नीटनेटकी हाय पोनीटेल करा. केसांना थोडा 'ड्राय शॅम्पू' लावल्याने ते ऑइली न दिसता फ्रेश दिसतात.