Sameer Amunekar
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरच झाडांना पाणी द्यावे. थोडे थोडे पण खोलवर पाणी द्या, म्हणजे मुळे चांगली ओलसर राहतील. कुंडीतील झाडांना रोज पाणी द्यावे, पण ओलसरपणा टिकतोय का हे आधी पाहा.
कुंडीतील झाडे थेट सूर्यप्रकाशापासून वाचवा. गच्चीवर असल्यास छत्री, ग्रीन नेट किंवा सावली असलेल्या ठिकाणी ठेवा. जमिनीतील झाडांभोवती पेंढा, कोरडे गवत किंवा कोकोपीट टाका, जेणेकरून माती थंड राहील.
उन्हाळ्यात खूप रासायनिक खते वापरू नका. घरगुती कंपोस्ट, गांडूळखत वापरणे जास्त फायदेशीर. झाडांची वाढ थोडी कमी होते उन्हाळ्यात, त्यामुळे खतांचे प्रमाणही कमी ठेवा.
सुकलेली पाने, फुले काढून टाका – यामुळे झाड टवटवीत राहते. काही झाडांवर उन्हाळ्यात कीड येते – त्यामुळे दर ८–१० दिवसांनी निरीक्षण करा आणि नैसर्गिक कीडनाशक वापरा.
आठवड्यातून एकदा झाडांवर पाण्याची हलकी फवारणी करा. यामुळे धूळ जाते आणि पाने ताजीतवानी राहतात. शक्य असल्यास झाडांभोवती थोडी मोकळी हवा ठेवा.
गुलाब, झेंडू, मोगरा, गुलाबपात्रा यांसारखी झाडे उन्हाळ्यातही नीट काळजी घेतली तर सुंदर फुले देतात. फक्त योग्य प्रमाणात पाणी देण आवश्यक असतं.