Sameer Amunekar
झाडावरील बुरशीग्रस्त पाने, फांद्या आणि फळे कातरणीने कापून लगेच नष्ट करा. त्यामुळे इतर भागांवर संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
१ लिटर पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा लिक्विड साबण आणि १ चमचा वनस्पती तेल मिसळून फवारणी करा. हा स्प्रे बुरशी वाढण्यापासून प्रतिबंध करतो.
निंबोळी तेल हे एक प्रभावी जैविक बुरशीनाशक आहे. हे पाण्यात मिसळून दर ७-१० दिवसांनी फवारणी करावी.
झाडांची फांदी व पाने विरळ ठेवा जेणेकरून झाडांभोवती हवा खेळती राहील. बुरशी दमट आणि बंद हवामानात जास्त वाढते.
गार्डन सेंटरमध्ये मिळणाऱ्या सल्फर किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट युक्त बुरशीनाशकांचा वापर तज्ज्ञ सल्ल्याने करा. वापरताना सुरक्षेची खबरदारी घ्या.
झाडांची नियमित तपासणी करा, विशेषतः पावसाळ्यापूर्वी आणि नंतर. समस्या दिसताच त्वरित उपाय करा.
खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी.