Sameer Amunekar
प्रत्येक इनडोअर प्लांटला वेगवेगळ्या प्रमाणात प्रकाश लागतो. थेट उन्हाऐवजी उजेड असलेल्या जागेत झाडे ठेवल्यास ती अधिक निरोगी राहतात.
रोज पाणी घालणे आवश्यक नसते. मातीचा वरचा थर कोरडा वाटल्यानंतरच पाणी द्या, अन्यथा मुळे कुजू शकतात.
कुंडीच्या तळाशी पाणी निचरा होण्यासाठी छिद्रे असणे गरजेचे आहे. साचलेले पाणी झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम करू शकते.
महिन्यातून एकदा सेंद्रिय खत किंवा लिक्विड फर्टिलायझर वापरल्यास झाडांची वाढ चांगली होते आणि पाने हिरवीगार राहतात.
पानांवर धूळ साचल्यास प्रकाश शोषण्याची क्षमता कमी होते. ओल्या कापडाने हलक्या हाताने पाने स्वच्छ करा.
एसी किंवा थेट गरम हवेच्या संपर्कात झाडे ठेवू नका. मध्यम तापमान आणि थोडी आर्द्रता इनडोअर प्लांट्ससाठी फायदेशीर असते.
पाने पिवळी पडणे, डाग दिसणे किंवा कीड दिसल्यास त्वरित उपाय करा. वेळेवर काळजी घेतल्यास झाडे दीर्घकाळ तंदुरुस्त राहतात.