Manish Jadhav
गोव्याला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. इथले बीचेस, धबधबे, अभयारण्ये पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.
गोवा पर्यटन विभागाने राज्यातील बीचेसव्यतिरिक्त इतर विविध पर्यटन स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘गोवा बियॉन्ड बीचेस’उपक्रम सुरु केला आहे.
गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकाने हेरिटेज साईटसह फॉरेस्ट रिझर्व्हही पाहावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे गोवा पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी दीपक नार्वेकर यांनी सांगितले.
पर्यटकाने गोव्याच्या खाद्यसंस्कृतीबद्दही जाणून घेतले पाहिजे.
राज्य सरकार होमस्टे धोरणाला चालना देत आहे, ज्याद्वारे पर्यटकांना समृद्ध वारसा असलेल्या सुंदर आणि शांत गांवामध्ये राहून आनंद घेता येईल, असे नार्वेकर म्हणाले.
गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकाने येथील स्थानिक संस्कृतीबद्दल जाणून घेतले पाहेज. विशेष म्हणजे, गोव्यातील उत्सव खूप खास असतात.
गोव्यात प्रसिद्ध अशी अभयारण्येही आहेत, ज्यामध्ये कोटीगाव, म्हादेई, नेत्रावळी, सलीम अली पक्षी अभयारण्ये येतात.
हे अभयारण्य कर्नाटकाच्या सीमेला लागून असलेल्या काणकोण तालुक्यात आहे. अभयारण्यात सहा टेहळणी बुरुज असून त्यांचा वापर वन्यजीव पाहण्यासाठी केला जातो.