Goa, Vitthal Rukmini Mandir: गजर विठुनामाचा...! गोव्यात कुठे आहेत विठ्ठल मंदिरे?

Manish Jadhav

गोवा अन् विठ्ठल भक्ती

गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच इथला निळाशार समुद्रकिनारा, धबधबे, अभयारण्ये येतात. पण गोव्याला भक्ती परंपराही आहे. होय, चकीत झालात ना...

Goa, Vitthal Rukmini Mandir

प्रतिपढंरपूर

गोव्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल मंदिर साखळी-विठ्ठलपूर येथे आहे.

Goa, Vitthal Rukmini Mandir

राज्यात 'या' ठिकाणी विठ्ठल मंदिरे

गोव्यात साखळीव्यतिरिक्त फोंडा, मडगाव, दिवाडी, म्हापसा, सांगे, कुंभारजुवे, रायबंदर, माशेल, केपे अशा अनेक ठिकाणी विठ्ठल मंदिरे आहेत.

Goa, Vitthal Rukmini Mandir

विठ्ठल स्थापना दिवस

चैत्रशुद्ध पौर्णिमा हा विठ्ठलाचा स्थापना दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संपूर्ण गोव्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या या मंदिरामध्ये आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायाचे जथे पहावयास मिळतात.

Goa, Vitthal Rukmini Mandir

विठ्ठलपुरात भाविकांचा गजर

मुळगाव, डिचोली, साखळी-कारापूर, वाळपई, विर्डी, होंडा, नावेली, पर्ये, हरवळे आणि इतर भागातून वारी विठ्ठलपुरात येते. जवळ-जवळ पंधरा ते वीस दिंड्या विठ्ठलपुरात येतात.

Goa, Vitthal Rukmini Mandir

महिलांना अभिषेक करण्याची संधी

एकादशीच्या दिवशी सोवळे नेसून विठ्ठल भक्तांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन अभिषेक करायला मिळतो. पुरुषांबरोबर महिलांनासुद्धा अभिषेक करण्याची संधी दिली जाते.

Goa, Vitthal Rukmini Mandir
आणखी बघण्यासाठी