Akshata Chhatre
आजकाल कोरियन ट्रेंड्सने फॅशनपासून संगीतापर्यंत प्रत्येक गोष्ट व्यापली आहे.
या 'K-Fever' मध्ये सर्वात पुढे आहे ती निखळ, बेदाग आणि काचेसारखी चमकणारी त्वचा ज्याला आपण ग्लास स्किन म्हणतो.
कोरियन सौंदर्य उत्पादनांना स्किनकेअरचे केंद्र मानले जाते आणि जगभरातील लोक आपल्या बजेटच्या बाहेर जाऊनही ही उत्पादने खरेदी करत आहेत.
कोरियन लोकांची ती चमक केवळ महागड्या क्रीम्स किंवा शीट मास्कमुळे आलेली नाही, तर ती त्यांच्या जेनेटिक्स आणि पारंपारिक सवयींचा परिणाम आहे.
यासाठी केवळ बाह्य उत्पादने नव्हे, तर तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.
एका कोरियन महिलेच्या मते, एका पारंपारिक पेय-जादूने त्यांच्या त्वचेचे सौंदर्य शतकानुशतके जपले आहे. या एका ड्रिंकमध्ये दडलेले आहेत आरोग्य आणि त्वचेच्या तेजाचे गुपित.
आले, मध, लिंबू आणि ज्युज्युबी (सुकलेले बोर) चा वापर करून बनवा हे पेय. जे आहे कोरियन शतकानुसंधीचे सौंदर्य रहस्य.