गोमन्तक डिजिटल टीम
पशुसंवर्धन खात्याने राज्यात कुत्रा पाळणाऱ्या मालकांसाठी मार्गदर्शन तत्त्वे जारी केली आहेत.
यापुढे एखादा व्यक्ती कुत्रा पाळत असेल आणि त्या कुत्र्यांमुळे मानव/प्राण्यांना इजा किंवा धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्या मालकाची असेल.
पशुसंवर्धन खात्याद्वारे काढलेल्या अधिसूचनेनुसार मालकाने पशुसंवर्धन खात्याला प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.
आपण पाळत असलेल्या कुत्र्यासंबंधीची कुत्र्याचे नाव, जन्म, ब्रीड, लिंग ही माहिती पशुसंवर्धन खात्याला देणे बंधनकारक केले आहे.
जर कुत्र्यामुळे कुणाला त्रास/हानी झाल्यास तसेच मालकाने हलगर्जीपणा केल्यास त्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
आपल्या कुत्र्यांमुळे प्राणी किंवा मानवाला इजा पोहोचली तर त्याचा संपूर्ण वैद्यकीय खर्च मालकाला करावा लागणार आहे.
आपल्या पाळलेल्या कुत्र्यांची योग्य काळजी न घेतल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.