Peshwa Madhavrao: शर्थीने सावरले 'हिंदवी स्वराज्य'! पानिपतच्या राखेतून मराठा साम्राज्य उभं करणारे 'माधवराव पेशवे'

Manish Jadhav

साम्राज्याचे पुनरुज्जीवन

1761च्या पानिपत युद्धात मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी पेशवेपद स्वीकारलेल्या माधवरावांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांची विस्कळीत झालेली सत्ता पुन्हा एकत्र आणली.

Peshwa Madhavrao | Dainik Gomantak

निजामाचा पराभव

निजामाने मराठ्यांच्या कमकुवत परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, पण माधवरावांनी 'राक्षसभुवन'च्या युद्धात निजामाचा दारुण पराभव करुन त्याला शरण येण्यास भाग पाडले.

Peshwa Madhavrao | Dainik Gomantak

हैदर अलीला लगाम

दक्षिण भारतात प्रबळ होत असलेल्या म्हैसूरच्या हैदर अलीला माधवरावांनी सलग मोहिमा आखून पराभूत केले आणि त्याच्याकडून मोठा दंड व प्रदेश वसूल केला.

Peshwa Madhavrao | Dainik Gomantak

दिल्लीवर पुन्हा वर्चस्व

माधवरावांनी महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मदतीने उत्तरेत पुन्हा मराठ्यांचा प्रभाव निर्माण केला. 1771 मध्ये मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली आणि मोगल बादशहा मराठ्यांच्या छत्राखाली आला.

Peshwa Madhavrao | Dainik Gomantak

कडक शिस्त आणि न्यायदान

माधवराव आपल्या शिस्तीसाठी ओळखले जात. त्यांनी राज्यकारभारात पारदर्शकता आणली आणि 'रामशास्त्री प्रभुणे' यांच्यासारख्या निष्पक्ष न्यायाधीशाची नेमणूक करुन स्वराज्यात न्यायाचे राज्य स्थापन केले.

Peshwa Madhavrao | Dainik Gomantak

भ्रष्टाचाराला आळा

त्यांनी महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. सरकारी पैशांचा अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली, ज्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती पुन्हा सुधारली.

Peshwa Madhavrao | Dainik Gomantak

प्रजेची काळजी

दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला आणि रयतेच्या हितासाठी अनेक विहिरी, तलाव व रस्ते बांधले.

Peshwa Madhavrao | Dainik Gomantak

अकाली आणि दुर्दैवी मृत्यू

सततच्या मोहिमा आणि अतोनात कष्टामुळे त्यांना क्षयाचा (TB) आजार झाला. 18 नोव्हेंबर 1772 रोजी वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी थेऊर येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे मराठा साम्राज्याचे पानिपतपेक्षाही मोठे नुकसान झाले, असे मानले जाते.

Peshwa Madhavrao | Dainik Gomantak

Peshwa Bajirao: 41 लढाया अन् एकही पराभव नाही, अवघ्या 48 तासांत गाठली दिल्ली; अटकेपार झेंडा फडकवणारा अपराजित 'बाजीराव'

आणखी बघा