Manish Jadhav
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे 41 लढाया लढल्या आणि त्यातील एकाही लढाईत त्यांना पराभव पत्करावा लागला नाही.
बाजीरावांच्या युद्धनीतीचा मुख्य आधार 'वेग' होता. मराठा घोडदळ इतक्या वेगाने हल्ला करायचे की शत्रूला सावरायला वेळच मिळायचा नाही. एका दिवसात ते 70 ते 80 मैल अंतर पार करत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या गनिमी काव्याला बाजीरावांनी उत्तर हिंदुस्थानच्या मैदानी प्रदेशात अत्यंत प्रभावीपणे राबवले. शत्रूला थकवणे आणि गोंधळात टाकणे ही त्यांची खासियत होती.
बाजीराव शत्रूशी थेट लढण्याऐवजी त्यांची रसद तोडण्यावर भर देत. पालखेडच्या लढाईत त्यांनी निजामाची रसद तोडून त्याला शरणागती पत्करायला भाग पाडले होते.
बाजीरावांना डोंगरदऱ्या आणि नद्यांचे अचूक ज्ञान होते. शत्रूला अशा ठिकाणी येण्यास भाग पाडायचे, जिथे त्यांचा अवजड तोफखाना निकामी ठरेल, हे त्यांचे मुख्य सूत्र होते.
त्या काळी मोगलांकडे अवजड तोफा होत्या, पण बाजीरावांनी हलक्या आणि चपळ घोडदळावर विश्वास टाकला. यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत लवकर माघार घेणे किंवा हल्ला करणे सोपे जायचे.
बाजीराव पेशवे केवळ रणनीती आखत नसत, तर ते स्वतः हातात तलवार घेऊन सैन्याच्या आघाडीवर असायचे. त्यांच्या या धाडसामुळे सैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारत असे.
"मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार नेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या महान योद्ध्याची युद्धनीती आजही जगाला चकित करते."