Peshwa Bajirao: बाजीराव पेशव्यांच्या 'त्या' 8 ऐतिहासिक लढाया! मराठ्यांचा 'भगवा' दिल्लीवर फडकवणारा महान सेनानी

Manish Jadhav

अजेय सेनानी

थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे 41 मोठ्या लढाया लढल्या आणि विशेष म्हणजे ते एकाही लढाईत पराभूत झाले नाहीत.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

पालखेडची लढाई (1728)

हैदराबादच्या निझाम-उल-मुल्कला बाजीरावांनी ज्या पद्धतीने घेरले, ती रणनीती आजही जगभरातील लष्करी अभ्यासात 'मोबिलिटी' (वेग) आणि 'गनिमी कावा' याचे सर्वोत्तम उदाहरण मानली जाते.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

माळवा विजय (1732-34)

बाजीरावांनी मुघलांच्या ताब्यात असलेला माळवा प्रदेश जिंकून मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तरेकडे मोठ्या जोमाने सुरु केला.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

बुंदेलखंड आणि छत्रसाल (1729)

महाराजा छत्रसाल यांना मुहम्मद खान बंगशच्या तावडीतून वाचवण्यासाठी बाजीरावांनी प्रचंड वेगाने कूच केली आणि बंगशचा पराभव करुन मराठ्यांचा दरारा निर्माण केला.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

दिल्लीवर धडक (1737)

बाजीरावांनी केवळ 500 घोडेस्वारांसह अवघ्या 10 दिवसांचे अंतर 48 तासांत कापून दिल्लीच्या वेशीवर धडक दिली होती, ज्यामुळे मुघल सम्राट मोहम्मद शाह लाल किल्ल्यात लपून बसला होता.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

भोपाळची लढाई (1737)

निझाम आणि मुघलांच्या संयुक्त सैन्याचा बाजीरावांनी भोपाळमध्ये पराभव केला. या युद्धानंतर 'दोरहा सराय'चा तह होऊन मुघलांनी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

वसईची मोहीम (1739)

बाजीरावांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव करुन वसईचा किल्ला जिंकला, हा मराठ्यांचा परकीय सत्तेवरील मोठा विजय होता.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

गनिमी कावा आणि वेग

बाजीरावांच्या यशाचे मुख्य रहस्य त्यांच्या घोडदळाचा वेग आणि शत्रूला रसद न मिळू देण्याची रणनीती (Scorched Earth Policy) हे होते.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

Suvarnadurga Fort: शत्रूला धडकी भरवणारा कोकणातील अजिंक्य 'सुवर्णदुर्ग'! 360 वर्षांपासून समुद्राच्या लाटांशी झुंज देत दिमाखात उभा

आणखी बघा