Manish Jadhav
बाजीरावांनी केवळ राज्यविस्तार केला नाही, तर आक्रमकांकडून होणाऱ्या प्रजेच्या छळाला उत्तर देण्यासाठी 'हिंदू पद पादशाही'चा विचार मांडला. जुलमी राजवटींच्या विळख्यातून सर्वसामान्य जनतेला सोडवणे, हेच त्यांच्या प्रत्येक मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते.
युद्ध मोहिमांवर असताना आपल्या सैन्याकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही, याची ते कडक काळजी घेत. जर चुकून नुकसान झालेच, तर शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश ते प्रशासनाला देत असत.
कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीज करत असलेल्या सक्तीच्या धर्मांतरापासून आणि अन्यायापासून प्रजेला वाचवण्यासाठी त्यांनी 'वसईची मोहीम' हाती घेतली. प्रजेच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी पोर्तुगीजांच्या बलाढ्य सत्तेशी संघर्ष केला.
जेव्हा कधी राज्यात दुष्काळ पडायचा, तेव्हा बाजीराव पेशवे सरकारी कोठारांची दारे प्रजेसाठी उघडत असत. रयतेला अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून त्यांनी अनेक वेळा महसूल (शेतसारा) माफ करण्याचे निर्णय घेतले होते.
बाजीरावांनी पुण्याला केवळ लष्करी केंद्र बनवले नाही, तर तिथे नवीन पेठा वसवल्या. व्यापाराला प्रोत्साहन दिले आणि सामान्य कारागिरांना, व्यापाऱ्यांना पुण्यात येऊन स्थायिक होण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करुन दिले.
बाजीरावांच्या दरबारात रयतेच्या न्याय निवाड्याला महत्त्व होते. कोणताही सामान्य माणूस थेट पेशव्यांपर्यंत आपली गाऱ्हाणी घेऊन जाऊ शकत असे. "न्याय करताना रंक आणि राव असा भेदभाव करु नका," ही त्यांची स्पष्ट भूमिका होती.
बाजीराव आपल्या सैनिकांवर पुत्राप्रमाणे प्रेम करत. युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबांची जबाबदारी सरकार दरबारी घेतली जाई. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि विधवांच्या उदरनिर्वाहाची सोय ते जातीने पाहत असत.
इतक्या मोठ्या साम्राज्याचे पेशवे असूनही बाजीरावांचे राहणीमान साधे होते. ते मोहिमेवर असताना सामान्य सैनिकांसोबत बसून भाकरी-कांदा खाण्यात धन्यता मानत. प्रजेच्या सुख-दु:खात सहभागी होणारा असा राजा रयतेला आपला वाटत असे.