Sameer Amunekar
पाळीदरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बदलते. यामुळे मेंदूमधील सेरोटोनिन कमी होऊन मूड स्विंग्स आणि तणाव वाढतो.
पोटदुखी, पाठदुखी, डोकेदुखी किंवा अंगदुखी यामुळे शरीर अस्वस्थ होतं आणि त्यातून मानसिक ताण वाढतो.
हार्मोनल असंतुलनामुळे पाळीदरम्यान झोप नीट लागत नाही. झोपेचा अभाव तणाव आणि चिडचिड वाढवतो.
रक्तस्रावामुळे शरीरात कमजोरी आणि थकवा जाणवतो. थकलेलं शरीर ताण-तणाव पचवू शकत नाही.
PMS (Premenstrual Syndrome) मुळे अचानक राग, उदासीनता, चिडचिड वाढते. ही भावनिक रोलर-कोस्टर तणावाला कारणीभूत ठरते.
पाळीदरम्यान अस्वस्थता असूनही दैनंदिन जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. यामुळे मानसिक दबाव वाढतो.
जास्त कॅफिन, झोपेची कमतरता, व्यायामाचा अभाव हे घटक पाळीदरम्यान तणाव अधिक तीव्र करतात.