Akshata Chhatre
c
चहाची खरी चव मिळवायची असेल, तर आधी पाणी उकळा, त्यात चहाची पाने घाला, मगच दूध मिसळा.
जर तुम्हाला आल्याचा चहा हवा असेल, तर चहाची पाने टाकण्यापूर्वीच पाण्यात आले घालायला विसरू नका.
साखर कधीही घालू शकता पण सर्व साहित्य मिसळल्यावर घातल्यास ती व्यवस्थित विरघळते.
सर्व घटक मिसळल्यावर चहा मंद आचेवर शिजवा. यामुळे स्वाद आणि सुगंध अधिक खुलतो.
सुकं आलं, वेलची, मिरी, लवंग, तमालपत्र हे सर्व पदार्थ गरम करून बारीक करा. एक चमचा मसाला २ कपांसाठी परफेक्ट!