Akshata Chhatre
लग्नाचा दबाव अनेकदा मन हळवं करू शकतो, विशेषकरून एक वय निघून गेल्यानंतर पण ३० नंतर तुम्ही अधिक समजूतदार असता.
तुम्हाला नात्यात 'काय' अपेक्षित आहे, हे स्वतःला स्पष्ट विचारा. विचारांशी, जीवनशैलीशी आणि मूल्यांशी तुमचे साम्य असेल, असाच माणूस निवडा.
तुमचे पहिले नाते का तुटले किंवा कोणती गोष्ट तुमच्यासाठी काम करत नाही, हे समजून घ्या. मागील अपयशातून शिकून पुढे जा. मागील अनुभवांना ओझे न समजता, चांगले बनण्याची संधी समजा.
ऑनलाइन ॲप्स वापरताना घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी वेळ द्या. तुम्ही स्वतःच्या ओळखीबद्दल आणि तुमच्या हेतूंबद्दल प्रामाणिक राहा.
योग्य व्यक्ती तुमच्या आजूबाजूलाही असू शकते. मित्रांच्या पार्ट्यांमध्ये, व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये किंवा छंदवर्गांमध्ये जा. तुम्ही तुमचे जग जितके खुले ठेवाल, तितके चांगले पर्याय मिळतील.
कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. 'परफेक्ट' साथीदाराच्या शोधात वेळ वाया घालवू नका. समोरचा व्यक्ती किती प्रामाणिक आहे, तुम्हाला समजून घेतो की नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा आदर करतो का, यावर लक्ष केंद्रित करा.
लग्नाला जीवनाचे 'अंतिम लक्ष्य' समजू नका. तुम्ही स्वतः आनंदी, संतुलित आणि आत्मविश्वासी असाल, तेव्हा तुमचे व्यक्तिमत्त्व आपोआप आकर्षक बनते.