Sameer Amunekar
काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांभोवतीची त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा. तेलकटपणा असल्यास काजळ लवकर पसरू शकते.
डोळ्यांच्या खाली हलकी कॉम्पॅक्ट किंवा ट्रान्सलूसंट पावडर लावल्याने अतिरिक्त तेल शोषलं जातं आणि काजळ टिकून राहण्यास मदत होते.
दिवसभर काजळ न पसरण्यासाठी वॉटरप्रूफ आणि स्मज-प्रूफ काजळ वापरणं फायदेशीर ठरू शकतं, विशेषतः पावसाळ्यात.
एकदम जाड काजळ लावण्याऐवजी बारीक थर लावा. गरज वाटल्यास दुसरा थर द्या. त्यामुळे लूक अधिक नीटनेटका दिसतो.
काजळाच्या अगदी जवळ काळ्या किंवा डार्क ब्राऊन आयशॅडोचा हलका टच दिल्यास काजळ सेट होण्यास मदत होते आणि स्मजिंग कमी होऊ शकते.
खालच्या पापणीखाली काजळ जास्त लावल्यास ते घामामुळे पसरू शकते. त्यामुळे बाहेरील कोपऱ्यापासून आतल्या बाजूला काजळाची जाडी हळूहळू कमी ठेवा.
काजळ लावल्यानंतर काही सेकंद डोळे जोरात मिटू नका. आरशात दोन्ही डोळ्यांचा लूक तपासा आणि कापसाच्या बडने पसरलेला अतिरिक्त काजळ हलक्या हाताने साफ करा.