Sameer Amunekar
मनातल्या गोष्टी न बोलता सतत गप्प राहिल्याने गैरसमज वाढतात. नात्यातील संवाद कमी झाला की भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो.
पार्टनरच्या प्रत्येक कृतीवर शंका घेणे किंवा सतत स्पष्टीकरण मागणे यामुळे नात्यातील विश्वास कमी होतो.
किरकोळ कारणांवरून वारंवार वाद होत राहिल्यास नात्यातील सकारात्मकता कमी होते. अशा भांडणांचा परिणाम हळूहळू मोठा होऊ शकतो.
व्यस्त जीवनशैलीमुळे एकमेकांसाठी वेळच उरत नसेल, तर नात्यात एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते.
भूतकाळातील चुका माफ केल्यानंतरही त्या प्रत्येक वादात पुन्हा समोर आणल्याने पार्टनरला सतत दोषी ठरवल्यासारखं वाटू शकतं.
नात्यात प्रेमासोबत परस्परांचा आदरही महत्त्वाचा असतो. टोमणे मारणे, अपमान करणे किंवा भावनांची किंमत न ठेवणे नात्यासाठी घातक ठरू शकते.
पार्टनरने आपल्याला न सांगताही सर्व काही समजून घ्यावं, अशी अपेक्षा ठेवणे गैरसमज निर्माण करू शकते. अपेक्षा स्पष्टपणे बोलून घेणे नातं मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे.